Sunday, July 14, 2019

पैसा

माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत पैशाशिवाय काहीही चालत नाही मग ,त्यासाठी कारण छोटा असो की मोठा पैशाला सर्वस्व मानणारी व्यवस्था आजही आपण पाहतो. असे म्हटले जाते की जिवंतपणी तर पैसा लागतोच नक्की अगदी जन्मल्यापासून पण मिळाल्यानंतर सुद्धा कपाळावरती एक शिक्का पैशाचाच लागतो. म्हणजे माणसाच्या आयुष्यात पैशाशिवाय तर कुठल्याही गोष्टीला महत्त्व नाही अशातलाही भाग नाही मात्र जगताना पैशाचा हिशोब शिवाय दुसरा कुठला आयुष्य माणूस मन लावून करत नाही. पैसा ही जगण्याची जणूकाही उमेद घेऊन येतो आणि तशाच पद्धतीने आयुष्यभर मानसा सोबत राहून त्याची इज्जत कधी वाढवतो तर कधी कमी करतो .अशा या सगळ्या जाणिवेचा विचार करत असताना, माणसाच्या जगण्यातला पैसा त्याच्याप्रमाणेच त्याला आयुष्यामध्ये साथ देतो कधी त्याच्यामुळे माणसाला धोका होतो हे आपणास कळत नाही. या सर्व बाबींचा विचार करत असताना एक मात्र नक्की की माणसाच्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये ,विचारांमध्ये आणि सुसंस्कृतपणा मध्ये पैशाला किती महत्त्व असते हे मात्र आपण निश्चित करू शकत नाही कारण या सगळ्या गोष्टी पैसा असणार्‍याकडे ही आहेत आणि नसणाराकडेही आहेत हे मात्र नक्की...!

Saturday, December 8, 2018

व्यवसाय

Business
व्यवसाय म्हणजे नेमकं काय ?
   अनेक जण आपापल्या कुवतीनुसार त्याची उकल करत राहतात ....पण मला असा एक  व्यवसाय दिसला की न स्वतःची जागा ,नाही राज्य पण व्यवसाय मात्र  इथल्या लोकांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा मग त्यामध्ये चहा, कॉफी ,नाश्ता ,नाश्त्यामध्ये पोहे ,उत्तप्पा, इडली, डोसा एवढंच नाही शिरा आणि उपीट सुद्धा ....!
    मग मला प्रश्न पडतो की , जी माणसं कारण सांगत बसतात की, नाही ते नाही म्हणून मी काही करू शकत नाही ती सर्व असा एखादा व्यवसाय पाहिल्यावर संपून जातात ...
 कारण, इथं सबब ,यास्तव, म्हणून या गोष्टीच कुठे पाहिला भेटत नाहीस . कारण इथे फक्त काम आणि कष्ट आणि संघर्ष याशिवाय दुसरं काहीच नाही पण हरलेल्या ची कुठेच थोडीशीही जाणीव दिसून येत नाही .अविरत पणाने काम करत राहणे हेच फक्त इथे पहिला मिळतं त्यामुळे बाकी काही नाही ज्या पद्धतीने हे कुटुंब दुसर्‍या राज्यातून येऊन महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अविरत कोणाचे कष्ट, जिद्द, चिकाटी, मेहनत ,आत्मविश्वास आणि कधीही न संपणारा उत्साह या सर्वांच्या बळावर होऊ घातलेल्या मोठ्या उद्योजकाचे स्वप्न जर पाहत असेल तर निश्चित रूपाने मला या ठिकाणी म्हणावसं वाटतं की हेच स्वप्न उद्योजक होण्याचं आपणास का पडू नये .....!
  तर ते नक्कीच आपणासही त्या स्वप्नाचा ध्यास लागावा आणि पूर्णतेचा एके दिवशी स्वास आपण घ्यावा तेवढं बळ अडचणी सांगणारा ना मिळो........!                   हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

Wednesday, December 5, 2018

आयुष्य

आयुष्य म्हणजे तरी नेमके काय असते ....!
चुकलेले दिवस ,गेलेल्या आठवणी ,येणारे प्रश्न ,सतावणारी जाणीव आणि असे बरेच काही .....
प्रश्न सगळ्यांनाच पडतात ,उत्तरही सगळेच शोधतात पण असे काही प्रश्न असतात की, त्यांची उत्तरं सापडतच नाहीत कितीही प्रयत्न केला तरी अगदी निरुत्तर व्हायला होतो. का कुणास ठाऊक पण मनाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही .
रस्त्यालगत उड्डाणपुलाच्या खाली एक वयोवृद्ध जोडपं दुपारच्या प्रहरी शांतपणे पोहोचलं होतं गोळाबेरीज कशाची करत होतो माहित नाही पण भावना मात्र स्वच्छ आणि सुंदर होत्या त्या टिपण्याचा मोह मला झाला आणि माझी पाऊल त्यांच्याकडे.....!
एकमेकांना या वयामध्ये ती खूप मोठा आधार देत होती गेलेल्या दिवसांची बेरीज आणि आलेल्या बाकी वरती भविष्यातला हिशोब ती मांडत होती . मला राहून राहून वाटलं नेमकं काय सांगत असतील ती एकमेकांना का  जुन्या आठवणी नवीन अनुभवासोबत मोजण्याचे काम ती करत असतील ,तेही माहीत नाही मी आपला फक्त अंदाज काढत राहिलो त्यांच्या जाणिवांचा आणि आयुष्यातल्या आलेल्या संघर्षाचा का कुणास ठाऊक पण माणूस म्हणून एक जाणीव त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली .बस !एवढेच माझ्या शब्दाचे सामर्थ्य ....!
तसेच ,त्यांच्या उणिवांना सरतेशेवटी तरी आनंदाची ,सुख-समाधानाची शिदोरी मिळो  हीच जगाच्या माऊली कडून अपेक्षा ........!

Sunday, December 2, 2018

असा मी

सगळ्या मध्ये असूनही एकटाच निवांत कसा मी .....!
   चहूबाजूनी हिरवळ पसलली असताना सुद्धा मी माझ्या मध्येच का एकटा .सगळ्याकडे पाहिल्यावर ती सल खूप सलते . हिरवळीची जाणीव होते मात्र मनातल्या सगळ्या भावना असूनही परक्या  झाल्यासारख्या वाटतात ....!
सगळंच आनंदाने  ओसंडून वाहत असताना ,मला मात्र माझी जाणीव नेहमी सतावते .प्रत्येक वेळी काही ना काही नवीन शिकत असताना ,येणाऱ्या जाणाऱ्यांची चाहूल जाणून घेत असताना सगळ्या बाबी अगदी नवख्या वाटतात आणि मग बरच काही जे  व्यक्तही करता येत नाही ,सतावत राहत नेहमी .....!
तरीही मला याचं काहीच वाटत नाही ,कारण मी शोधतोय माझ्यातल्या सगळ्या चांगल्या गुणांना याचा वापर करणार आहे मी इतरांची आयुष्य  हिरवळ करायला .आपण म्हणाल हा तुमचा मोठेपणा झाला पण तसं नाही ते जग आणि ती जाणीव या सगळ्या बाबी बर्‍याच काही गोष्टी शिकून गेल्यात मला .त्यामुळे आता स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगणे .दुःख हे प्रत्येकालाच आहे परंतु स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा इतरांच्या जगण्यातला आनंद हा सुद्धा शाश्वत आहे .तो  पहावा ,त्याची जाणीव करून घ्यावी आणि जगण्याची मजा लुटावी ....!
नाहीतरी सुरुवातीला शेवट हा निसर्गाचा नियमच आहे याला मी कसा अपवाद असणार ....
जगा स्वतःला स्वातंत्र्य देऊन ...!

Friday, November 30, 2018

थांबू नको ...

माणसात आणि झाडात असा काय फरक असतो , झाडाला बोलता येत नसूनही ते नाही थांबत आपल्या जीवनामध्ये कितीही अडथळे आले तरी अविरत पणाने त्याची वाटचाल चालूच असते ,कुठल्याही अडथळ्याला न जुमानता .
मात्र आपले तसे नाही , लहानसहान  गोष्टींना कवटाळत बसतो आपण ....आता  काय होणार , आपण कसे सावरणार ? अशा एक ना अनेक प्रश्नांनी भांबावून जातो आपण , पण आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःमधलं अस्तित्व शोधून अविरत पणाने पुढं वाढ वाटचाल करायची हे आम्हाला झाडाकडून शिकावे लागेल. आपण पाहतो की फांद्या तोडल्या तरी ते स्वतः ची वाढ नाही थांबवत .....!
   पण माणसाचे तसे नाही ,अनेक अडथळे पुढे येतात आणि आपण थांबतो तिथेच .आता मला काही सुचत नाही ,आता मी काय करणार ,आता माझी कशी होणार या एक ना अनेक प्रश्नांनी तो भांबावून जातो पुरता .मग मला म्हणावेसे वाटते ,आपण पर्यावरण कडून बरेच शिकण्यासारखे असते ....पाठीमागे नाही राहायचे ,प्रयत्न नाहीत सोडायचे .मात्र असे होताना दिसत नाही आणि अडकून बसतो आपण खुळ्या कल्पना मध्ये मात्र झाड तसे करत नाही फांद्या तुटल्या तरी ते थांबत नाही ते पर्याय शोधत राहतं नव्या जागेतून पालवी फुलवण्याचं काम करत आणि स्वतःची ओळख तयार करत पण माणसाचं तसं नाही ती तिथेच थांबतील आपली तक्रार इतरांना सांगत पण झाडासारखं माणसांनीसुद्धा वागावं आणि कितीही अडथळे आले तरी आपलं विश्व आपले एक नवीन जग तयार करावे .....!
  ही माणसातल्या माणसाकडून माफक अपेक्षा .....!

Monday, November 12, 2018

वेदना

आयुष्यामध्ये असे काही क्षण असतात की त्याच्या वेदना सुद्धा अनंत असतात ....

  काही केल्या संपत नाहीत ,खूपच त्रासदायक ठरत राहतात मानवी मनाला फुंकर घालावी अशी काही क्षण येतात .मानवी मन त्याला त्या वेदनांना कितपत साथ देतो हाही विचार करण्यासारखा विषय .माहित नाही जगण्याला कशाने अर्थ येतो .पण आयुष्य तरीपण जगावं वाटतं ,आजचा दिवस निघून जाईल उद्या समाधानाने जगता येईल ,याअपेक्षे पोटी मानवाचे आयुष्य एक एक दिवस आयुष्यातला काढत राहत.
  हे जग असेच आहे .
   असो ,मानवाच्या मूलभूत गरजा याच पूर्ण होण्याची अपेक्षा करण फक्त आपल्या नशिबी उरल..
बाकी सारा प्रपंच हा येणारे दिवसच ठरवणार .नक्कीच उद्याला चांगलं जगता यावं एवढी अपेक्षा करू नये का या भाबड्या मनाने .....
चला जगणं सुंदर करूया, जगूया या अशा लोकांसाठी थोडासा तरी वेळ देऊया ..

जगातलं थोडं जरी दुःख कमी करण्याचा आपण प्रयत्न केला ,तर ते खूप मोठे कार्य होईल .
  हे कार्य आयुष्याला आकार देऊन जाईल .....!
 

Wednesday, November 7, 2018

नारळ

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा म्हटलं यांची उपस्थिती आलीच ....
काही का असेना कार्यक्रमाची सुरुवात ही आमच्या पासूनच शुभ कार्य हे आमच्या उपस्थितीशिवाय होणे नाही .नेहमी आम्ही अशा कार्यक्रमाचे साक्षीदारच होतो .
सण, उत्सव ,आनंदोत्सव सुरुवात या सर्वांचे आम्ही साक्षीदार ....नवे ते आमच्या शिवाय होऊ शकत नाही .
आम्हाला नेहमी माणसांच्या आनंदाचा हिस्सा होता येतं .त्यात खूप मोठे समाधान वाटतं ,जगण्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतं .कारण दररोज आमचा मुक्काम कुठेतरी पोत्यात अडगळीला पडलेला त्यामुळे मग आम्ही जेव्हा माणसांमध्ये येतो कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होतो तेव्हा मनाला खूप बरं वाटतं .मग मात्र आमच्या मना मध्ये एवढा आनंद होतो की आता सर्वजण आपल्यासाठी जणू आपली वाटच पाहत बसलेले असतात ...
मग सगळ्यांकडे पाहात पाहात आयटीत प्रमुख पाहुण्यांच्य हातात जायचं आणि स्वतःला संपवायचा आणि कार्यक्रमाचा श्रीगणेशा करायचा ....
म्हणजेच स्वतःचं अस्तित्व संपवायचं आणि दुसर्‍यांना आनंद घ्यायचा म्हणजेच झाला कार्यक्रमाचा श्रीगणेशा .....
यांची ओळख कोणी ठेवताना दिसत नाही मात्र कुणाच्या हस्ते आमचे जगण्याचे सार्थक झाले हे मात्र लोक फोटो,व्हिडिओ यांच्या साह्याने आठवणी ताज्या करतात मात्र आम्हाला प्रसाद म्हणून खूप मोठा मानही मिळतो  मात्र सन्मान हा त्या ठिकाणी असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना मिळतो ....
त्यात आणखीन एक गंमत म्हणजे आम्ही जर का खराब निघालो तर आश्चर्याची एक वेगळीच गोष्ट आमच्या नजरेत भरते ती म्हणजे सर्वजण आम्हाला "नारळ पावला" असे म्हणून कुणालाही प्रसाद न मिळाल्यामुळे सर्वजणच आळंदी होतात ....हेही एक नवलच म्हणावे लागेल .
असो ,समाधान मिळते हे काही थोडके नाही त्यामुळे आपण नेहमीच सत्कार्याची सुरुवात करतो हे मनाला असणारे खूप मोठे समाधान घेऊनच आयुष्य सार्थकी लागले हा आनंद पुरून उरणारा आहे .....!