Thursday, January 28, 2016

सांत्वनहिरव्या गार पसरलेल्या त्या हिरवळीत आठवणी ही किती हळव्या भावना व्यक्त करतात …. तुलनेच्या जगात जेंव्हा अवहलनेची किंमत वजा केली जाते …. आयुष्यरूपी वादळ येण्याआधी जसा शांत वारा सुटावा …. मनमोहक वाटणा-या आठवणीच्या क्षणांचा नकळत शेवट व्हावा. अगदी असंच तुझं ते वाक्य माझ्या अस्मीतेला स्वत:ची ओळख पटवून देणार, ‘मी चालेल’ ….

शब्दांच्या सागरात एखादा शब्द वाक्यरुपी माशांने गिळंकृत करावा अशी ती वेळ …. त्याच वेळेला मनाच्या गाभा-यात स्वत:च अस्तीत्व कुठंतरी शोधू पाहणारं …. थोड वेडावलेलं …. थोड घाबरलेलं …. माझं सर्वस्व …. विसरलेल्या माणसांना शोधण्यासाठी पेटून उठलेलं ते …. खरचं माणुसकीच्या बाजारात मानसांच्या भावनांचा लिलाव होत असेल का ? दु:ख आणि दारिद्रयांनी नटलेल्या मनांना आशेचा वारा लाभेल का ? आतापर्यंत जगलेल्या आयुष्याच्या आठवणी हे मन जपुन ठेवल का ? शोधण्यासाठी आलेल्या वाटा न शोधताच परत फिरतील का ? गारठलेल्या मनांना उबदार वारा लागावा आणि त्या उबीन थोडसं अस्तीत्त्व शिल्लक राहिल्यासारखा भास …. आणि फक्त भासच.

मला माहीत नाही, तुला लाभलेली चाहूल ....
स्वत:च मन विसरायला लावणारी ….
पहूडलेल्या भावनांना चेतणारी ….

असो;
एखादया माणसान जवळ यावं अन् वाटाव त्यान कधी परतीच्या प्रवासाविषयी बोलुच नये. पण, मनाचे सर्वच अंदाज बरोबर असत नाहीत.
तुझ्या आयुष्याच वळण आता बदललयं, विसावलेल्या वाटांना आता वाटसरूच अनमोल येणं लाभलयं …. सुख-दु:खांच्या अनंत आशा पदरी बांधून त्याच पदरानं तुला अनेक वादळांना आडवत त्या वाटसरूची ती वात जपुन न्याव्ही लागणार आहे. आठवणीचं साध वारं हे त्या वादळाहुन ही खूप भयानक असतं याचही भान विसरायला नको आहे तुला.

कुपोषीत बालकांच्या रांगेत तुझं पोट तुला अगदी हसत-हसत भराव लागेल तेवढी पात्रता तुझ्या अंगी आहे याचाही विसर पडू नये मानवीप्रवृत्तीपुढे …. कधी-कधी माणसांनी स्वत:च्या मनाला आवर घालायला शिकलं पाहिजे स्वत:च असं कांही न हरवता …. हरवलेल्या आठवणीचा शोध घेण्यात कांहीच अर्थ नसतो म्हणजेच भुतकाळ हा मानसाला सुख देत नाही कारण वर्तमान भूतकाळापेक्षाही जीवंत असतो. बंदीस्त जरी नजर असली तरी मनाच्या डोळयांनी पाहायची सवय लावायला हवी तुला. ओळखीच्या माणसांची भिती तुझ्या मनातून निघुन जायला थोडा वेळ लागेल पण ….

म्हणूनचं वाटतं
माझं असेल कांही जे
तेच तुला विसराव लागेल.
भुतकाळाची कळी,
वर्तमानाचं फूल,
आता भविष्याच्या हाती दयायचं,
धाडस करावं लागेल.
तू आहेस तशीच
विरळ आठवणी,
ते वेडं मन….
‘मी’ मी सुध्दा विसरलो आहे !
कांही गोठरींचा विसर
चांगला असतो नवीन आचारासाठी ….
कालची शिदोरी,….
आज खावीसी वाटत नाही
ती खाऊही नको ….


शेवटी ‘आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती जर सुखी समाधानी असेल तर आपणही किती सुखी होतो नाही !’

कांही माणसं स्वत:पेक्षा इतरांवर जास्त लक्ष्य देतांत, अशी माणसं खूप मोठया -हदयाने भावना व्यक्त करणारी असतात. स्वत:च जे आहे त्याला दुस-याच्या आरशात पाहण्याचं काम ती करतात. अवघडलेल्या भावनाही ते सहज व्यक्त करतात पण हे कधी-कधी बदलावं लागत, स्वत:ची ओळख करून …. देण्यासाठी.

मी विसरलो सर्व कांही आठवणीच्या ओघात जळुन खाक झालेलं ते वेडं ‘प्रेम’ त्या वेळेनं दिलेल्या वेदना …. वातावरणाचं क्रौर्य …. तशीच निसर्गाची साथ सुध्दा ….

कांही आठवणीची आठवण होते, तर कांही साठवता येत नाहीत म्हणुन आठवणीत
 राहतात ….

आता कल्पनाविश्व फक्त भासमान वाटायला हवं …. किडलेल्या लाकडासारखं. वास्तवाला न विसरता भविष्याची कल्पना मनात ठेवायला वेळ द्यावा लागेल …. नवीन अनोळखी माणसं सापडतील जीवनाच्या वाटेवर त्यांच्याशी मैत्रीही करावी लागेल आणि वेळ पडलीच तर संघर्षही.

तुला विसरण
मला कांही अवघड नाही ….
तू परतून पहावं
यालाही मी किंमत देत नाही.
मलाही खूप वळायचयं,
वळण वेडया वाटेवरुन,
खरचं तुझ्या सांत्वनासाठी शब्द नाहीत माझ्याजवळ ….

No comments:

Post a Comment