Tuesday, November 29, 2016

स्वप्न आणि वास्तव

मानवी जीवनाचा हा पसाराच जणू उभा आहे तो एका स्वप्नासाठी , मग ती स्वप्न स्वतःची असतील नाहीतर दुसऱ्याची असतील म्हणजेच कांही लोक स्वतःच्या स्वप्नासाठी जगतात , तर कांही इतरांच्या स्वप्नासाठी ......!
येथे म्हणण्याचा उद्देश हा की स्वतः पाहीलेल्या स्वप्नासाठी अविरतपणे कष्ट , त्रास, वेदना, दु:ख सोसत राहून त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटत राहनं . मग त्यामध्ये मिळणारे दु:ख असेल किंवा आनंद असेल तो स्वतःचाच असतो, त्याची जबाबदारी ही सुद्धा दुसऱ्याकोणाची नसून ती शंभरटक्के आपलीच असते .
मग आता विषय येतो तो दुसऱ्यांसाठीच्या स्वप्नांचा म्हणजेच कोणी एक व्यक्ती त्याच्या स्वप्नांसाठी आपल्याकडून त्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम करून घेत असते.
मग आपण नेमकं कुठे बसतोत हे आपणच ठरवायचं .....!
स्वत:च्या स्वनासाठी जगताना स्वतःच्याच कल्पना,योजना,विचार,ध्येय-धोरणे आहेत तर दुसऱ्यांच्या स्वप्नामध्ये या सर्व बाबी त्याच्या असतात आपण फक्त एक राबता धनी.
मग माणसाने आता हे निश्चीत करावं की नेमकं कुणाच्या स्वप्नासाठी जगायचं ?
मग त्याच्यामध्येही आणखीन एक फरक तो असा की , स्वप्न स्वतःची असो की दुसऱ्याची ती मग फक्त आणि फक्त वैयक्तीक आपल्याच स्वार्थाची आहेत की त्यात मग इतरांचाही फायदा आणि कल्याण आहे हे ही महत्वाचेच ; आणि जर का त्याचे उत्तर हो असेच असेल तर मग तेही नसे कोडेच असेच म्हणावे लागले.
मग आपणच ठरवायचं नेमकं जगनं कोणाचं......!

Monday, November 28, 2016

शेतकरी
जग सुंदर आहे की नाही हे माहीत नाही पण, माणसारखं जगायला आणि आयुष्याचे बंध फुलवायला मातीशीच नातं असावं लागतं .माणुसकी आता नेमकी शोधायची कुठे हाही तसा प्रश्नच म्हणा पण ..... उत्तरे सापडतील कधी ना कधी हाही वेडा आशावादच असतो शेतकऱ्याच्या आयुष्यात आणि त्याच्यासाठीच तर चाललेली धडपड असते आयुष्याची .
मावळतीला जाणारा प्रत्येक दिवस हा एक उदयाचे एक उज्वल भाविष्य घेऊन येईल ही भोळी आशा माझ्या बळीराजाची स्वप्न दिवास्वप्न न ठरता ती पूर्णत्वास जावोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना .....!