Tuesday, November 29, 2016

स्वप्न आणि वास्तव

मानवी जीवनाचा हा पसाराच जणू उभा आहे तो एका स्वप्नासाठी , मग ती स्वप्न स्वतःची असतील नाहीतर दुसऱ्याची असतील म्हणजेच कांही लोक स्वतःच्या स्वप्नासाठी जगतात , तर कांही इतरांच्या स्वप्नासाठी ......!
येथे म्हणण्याचा उद्देश हा की स्वतः पाहीलेल्या स्वप्नासाठी अविरतपणे कष्ट , त्रास, वेदना, दु:ख सोसत राहून त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झटत राहनं . मग त्यामध्ये मिळणारे दु:ख असेल किंवा आनंद असेल तो स्वतःचाच असतो, त्याची जबाबदारी ही सुद्धा दुसऱ्याकोणाची नसून ती शंभरटक्के आपलीच असते .
मग आता विषय येतो तो दुसऱ्यांसाठीच्या स्वप्नांचा म्हणजेच कोणी एक व्यक्ती त्याच्या स्वप्नांसाठी आपल्याकडून त्याच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम करून घेत असते.
मग आपण नेमकं कुठे बसतोत हे आपणच ठरवायचं .....!
स्वत:च्या स्वनासाठी जगताना स्वतःच्याच कल्पना,योजना,विचार,ध्येय-धोरणे आहेत तर दुसऱ्यांच्या स्वप्नामध्ये या सर्व बाबी त्याच्या असतात आपण फक्त एक राबता धनी.
मग माणसाने आता हे निश्चीत करावं की नेमकं कुणाच्या स्वप्नासाठी जगायचं ?
मग त्याच्यामध्येही आणखीन एक फरक तो असा की , स्वप्न स्वतःची असो की दुसऱ्याची ती मग फक्त आणि फक्त वैयक्तीक आपल्याच स्वार्थाची आहेत की त्यात मग इतरांचाही फायदा आणि कल्याण आहे हे ही महत्वाचेच ; आणि जर का त्याचे उत्तर हो असेच असेल तर मग तेही नसे कोडेच असेच म्हणावे लागले.
मग आपणच ठरवायचं नेमकं जगनं कोणाचं......!

No comments:

Post a Comment