Monday, January 23, 2017

मानवता

ज्या ज्या ठायी महानता तेथे नांदो मानवता ही विनंती ईश्वरा ...
जे-जे चांगले ते असावे माझे तसेच त्यातून निर्माण होवो सदाचार आणि जे की असे आचरण असेल की त्यातून योग्य आणि उचितच घेतील सर्व लोक कल्याणापर्यंत जाण्यासाठी मग प्रयत्न केला जाईल तो माणुसकी जपणाऱ्या मानवी आचार-विचार व संस्कारांचा .
  माणूसकीच्या भिंत्ती देतील आधार कोसळलेल्या विचारांना सावरण्यासाठी आणि मग निर्माण होईल सर्वत्र आनंद आणि व्यक्त केले जाईल समाधान येणाऱ्या पिढयातील नवयुवकातील विचारांना प्रफुल्लीत करण्यासाठी .
स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे मग सर्वाच्या ठायी असणारे ज्ञान देखील व्यक्त होईल समाजाच्या कल्याणासाठीच जणू. त्यातील वेग-वेगळे तत्व त्याचे होईल मग तत्वज्ञान आणि त्याचे उपासकही होतील आनंदी मग काय सर्वच जे कीचांगले ते जे घेऊन जाईल सर्वानाच आत्मीक सुखाकडे ....
     मानवी कल्याण हाच विषय जर प्रत्येकाचा झाला तर मग काय ?
      मानवताच वसेल ना सर्वांच्या घरी , घराचे घरपण मग दिसेल अगदी शोभून त्यात वास होईल ईश्वराचा मग मन स्वच्छ करण्यासाठी मंदीरात जाण्याची गरजच उरणार नाही कारण घरच झालेले असेल मंदीर आणि प्रत्येकामध्ये असेल ईश्वर तोच ईश्वर तुमच्याचला माझ्यातला एक होवो व सबंध जगाचे कल्याण होवो हीच मानवतेची प्रार्थना......