Monday, September 4, 2017

भावना .....!

शोधतो मी माझ्या मनातले भाव ...
न चुकता रोज सायंकाळी
  वेळ मिळाला निवांत तर ...!
पण कधी - कधी होतो उशीर
  वेळात वेळ मिळवायला ...
   तसं गणित कच्चच आमचं
    वेळात वेळ मिळवायला .

कधीतरी वाटते मनाला
नको - नको ते भाव टिपायला
पण सांगायचे कोणाला ?
नाहीतरी कुणाच्या मनात
चाललंय काय ?
हेही अनोळखीच सर्वांना ...

मन मात्र गप्प बसत
पण लावतं कामाला सर्वांना
नाहीतरी काय भाव + भावनेच्या जगात
खरंच नकोस वाटत
   जिंकायला ...

Sunday, September 3, 2017

सौंदर्य ....!

मानवी जीवनाची ही जी कांही जीवन जगण्याची पध्दत्ती आहे ती मुळातच आयुष्य खूप सुंदर आहे. या भावनेपोटी तो सतत आपले सर्वस्व जीवनातल्या लहान मोठया प्रसंगामध्ये तो पहात असतो मग त्याची जगण्याची कलाही आस्तित्वाचाच एक भाग बनून राहते .
    समोरच्या व्यक्तीच्या आतील कला किंवा त्यामध्ये लपलेला कलाकार शोधत असताना आपणास त्यातील लपलेला भाव आणि त्या कलाकृतीच्या पाठीमागची त्या व्यक्तिची भावना समजल्यावर निश्चीतच त्या कलाकृतीचे सौंदर्य आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही , म्हणून त्या कलाकृतीकडे आपली पाहण्याची चांगली भावना येथे महत्वाची ठरते हे मात्र निश्चीत.
एखादया कलाकाराच्या कलाकाराच्या कलाकृतीतील सौंदर्य टिपण्या अगोदर आपणास आपल्या मनातील सौदर्याची जाणीव आणि तेवढीच जाण असने अत्यंत गरजेचे असते .
कधी - कधी आप - आपल्या सौंदर्याच्या बाबतीत वेग-वेगळ्या कल्पनाही असू शकतात कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने हे ही घडू शकते त्यामुळे आप - आपली त्या - त्या दृष्टीने बघण्याची वृत्तीही येथे महत्वाचीच ठरते .
  एखादया दिसायला सुंदर नसणाऱ्या लेकराकडे त्याची आई आपल्या नजरेतल्या सौंदर्याने पाहते तिला त्याच्या मध्ये तिचं जग आणि जगणंही दिसतं हे महत्वाच म्हणजेच , नजरेतल आणि मनातलं प्रेम हे देखील सौंदर्याची व्याख्या बदलते हे नक्की .....!