Friday, November 30, 2018

थांबू नको ...

माणसात आणि झाडात असा काय फरक असतो , झाडाला बोलता येत नसूनही ते नाही थांबत आपल्या जीवनामध्ये कितीही अडथळे आले तरी अविरत पणाने त्याची वाटचाल चालूच असते ,कुठल्याही अडथळ्याला न जुमानता .
मात्र आपले तसे नाही , लहानसहान  गोष्टींना कवटाळत बसतो आपण ....आता  काय होणार , आपण कसे सावरणार ? अशा एक ना अनेक प्रश्नांनी भांबावून जातो आपण , पण आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःमधलं अस्तित्व शोधून अविरत पणाने पुढं वाढ वाटचाल करायची हे आम्हाला झाडाकडून शिकावे लागेल. आपण पाहतो की फांद्या तोडल्या तरी ते स्वतः ची वाढ नाही थांबवत .....!
   पण माणसाचे तसे नाही ,अनेक अडथळे पुढे येतात आणि आपण थांबतो तिथेच .आता मला काही सुचत नाही ,आता मी काय करणार ,आता माझी कशी होणार या एक ना अनेक प्रश्नांनी तो भांबावून जातो पुरता .मग मला म्हणावेसे वाटते ,आपण पर्यावरण कडून बरेच शिकण्यासारखे असते ....पाठीमागे नाही राहायचे ,प्रयत्न नाहीत सोडायचे .मात्र असे होताना दिसत नाही आणि अडकून बसतो आपण खुळ्या कल्पना मध्ये मात्र झाड तसे करत नाही फांद्या तुटल्या तरी ते थांबत नाही ते पर्याय शोधत राहतं नव्या जागेतून पालवी फुलवण्याचं काम करत आणि स्वतःची ओळख तयार करत पण माणसाचं तसं नाही ती तिथेच थांबतील आपली तक्रार इतरांना सांगत पण झाडासारखं माणसांनीसुद्धा वागावं आणि कितीही अडथळे आले तरी आपलं विश्व आपले एक नवीन जग तयार करावे .....!
  ही माणसातल्या माणसाकडून माफक अपेक्षा .....!

Monday, November 12, 2018

वेदना

आयुष्यामध्ये असे काही क्षण असतात की त्याच्या वेदना सुद्धा अनंत असतात ....

  काही केल्या संपत नाहीत ,खूपच त्रासदायक ठरत राहतात मानवी मनाला फुंकर घालावी अशी काही क्षण येतात .मानवी मन त्याला त्या वेदनांना कितपत साथ देतो हाही विचार करण्यासारखा विषय .माहित नाही जगण्याला कशाने अर्थ येतो .पण आयुष्य तरीपण जगावं वाटतं ,आजचा दिवस निघून जाईल उद्या समाधानाने जगता येईल ,याअपेक्षे पोटी मानवाचे आयुष्य एक एक दिवस आयुष्यातला काढत राहत.
  हे जग असेच आहे .
   असो ,मानवाच्या मूलभूत गरजा याच पूर्ण होण्याची अपेक्षा करण फक्त आपल्या नशिबी उरल..
बाकी सारा प्रपंच हा येणारे दिवसच ठरवणार .नक्कीच उद्याला चांगलं जगता यावं एवढी अपेक्षा करू नये का या भाबड्या मनाने .....
चला जगणं सुंदर करूया, जगूया या अशा लोकांसाठी थोडासा तरी वेळ देऊया ..

जगातलं थोडं जरी दुःख कमी करण्याचा आपण प्रयत्न केला ,तर ते खूप मोठे कार्य होईल .
  हे कार्य आयुष्याला आकार देऊन जाईल .....!
 

Wednesday, November 7, 2018

नारळ

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा म्हटलं यांची उपस्थिती आलीच ....
काही का असेना कार्यक्रमाची सुरुवात ही आमच्या पासूनच शुभ कार्य हे आमच्या उपस्थितीशिवाय होणे नाही .नेहमी आम्ही अशा कार्यक्रमाचे साक्षीदारच होतो .
सण, उत्सव ,आनंदोत्सव सुरुवात या सर्वांचे आम्ही साक्षीदार ....नवे ते आमच्या शिवाय होऊ शकत नाही .
आम्हाला नेहमी माणसांच्या आनंदाचा हिस्सा होता येतं .त्यात खूप मोठे समाधान वाटतं ,जगण्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतं .कारण दररोज आमचा मुक्काम कुठेतरी पोत्यात अडगळीला पडलेला त्यामुळे मग आम्ही जेव्हा माणसांमध्ये येतो कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होतो तेव्हा मनाला खूप बरं वाटतं .मग मात्र आमच्या मना मध्ये एवढा आनंद होतो की आता सर्वजण आपल्यासाठी जणू आपली वाटच पाहत बसलेले असतात ...
मग सगळ्यांकडे पाहात पाहात आयटीत प्रमुख पाहुण्यांच्य हातात जायचं आणि स्वतःला संपवायचा आणि कार्यक्रमाचा श्रीगणेशा करायचा ....
म्हणजेच स्वतःचं अस्तित्व संपवायचं आणि दुसर्‍यांना आनंद घ्यायचा म्हणजेच झाला कार्यक्रमाचा श्रीगणेशा .....
यांची ओळख कोणी ठेवताना दिसत नाही मात्र कुणाच्या हस्ते आमचे जगण्याचे सार्थक झाले हे मात्र लोक फोटो,व्हिडिओ यांच्या साह्याने आठवणी ताज्या करतात मात्र आम्हाला प्रसाद म्हणून खूप मोठा मानही मिळतो  मात्र सन्मान हा त्या ठिकाणी असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना मिळतो ....
त्यात आणखीन एक गंमत म्हणजे आम्ही जर का खराब निघालो तर आश्चर्याची एक वेगळीच गोष्ट आमच्या नजरेत भरते ती म्हणजे सर्वजण आम्हाला "नारळ पावला" असे म्हणून कुणालाही प्रसाद न मिळाल्यामुळे सर्वजणच आळंदी होतात ....हेही एक नवलच म्हणावे लागेल .
असो ,समाधान मिळते हे काही थोडके नाही त्यामुळे आपण नेहमीच सत्कार्याची सुरुवात करतो हे मनाला असणारे खूप मोठे समाधान घेऊनच आयुष्य सार्थकी लागले हा आनंद पुरून उरणारा आहे .....!

स्टडी टेबल

काय बोलू ....आपल्या सर्वांसाठी हीच माझी ओळख .मी नेहमी सज्जच असतो आपल्यासाठी, आपल्या कामासाठी .कुठलेही काम असो मला कंटाळा करून चालणार नाही .कारण प्रत्येक काम मला तेवढंच महत्त्वाचं वाटतं मात्र ते त्या कामाविषयी मनाला त्याच्या या पूर्ण ते विषयी असणारी चाहूल ही सुद्धा मला तेवढीच महत्त्वाची वाटते .आपण आपल्या कामाविषयी तेवढ्याच आपुलकीने ते कार्य करावे असे सुचवावेसे वाटते माझा तो हक्क नाही पण विनंती करावी असे वाटले म्हणून हा प्रयत्न .....मात्र एक नक्की की प्रत्येक कामाविषयी माझ्याकडे असणारा दृष्टिकोन हा समान आहे जनु मला तू राज्यघटनेतल्या "समता  " या तत्त्वाशी जवळ जाणारा वाटतं त्याचं समाधान वाटतं .असो ....
प्रत्येक काम करत राहणे आणि नवीन नवीन गोष्टी लक्षात घेणे हे सतत सतत चालणारच पण कंटाळा ....
मुळीच नाही सतत काम करत राहा तुम्हालाही आनंद भेटेल .मला ज्या प्रमाणे नवीन नवीन विचार भेटतात तसेच आपणास ही सततच्या कामामुळे भेटत राहतील पण मी सतत शोधत राहतो नाविन्य आणि नवीन कल्पना या सर्वांचा मी सोबती आहे .माझ्याकडे आणि एक विचारांची संपदा आहे ती लिहिण्याच्या अगोदर मला ऐकायला येते कारण माझ्या शेजारी बसलेल्या सर्व भावना या मला  अगोदर स्पर्श करतात आणि मग नंतर ते शब्दबद्ध होतात .त्यामुळे शब्दबद्ध होण्या अगोदर चा त्यांचा स्पर्श मला झालेला असतो तो आनंद मी शब्दात व्यक्त नाही करू शकत .....
आणि विचार हे मला बरेच काही शिकवून जातात आणि मी सुद्धा तेवढ्यात आपुलकीने ते लक्षात येतो त्यामुळे मला विचारांची जाणीव सतत होत राहते . ती जाणीव न राहता मला खूपच त्यापासून शिकता येते त्यामुळे मला हा सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो तो असाच मिळत राहावा एवढीच माफक अपेक्षा .......!

स्कूल बॅग (शाळेची पिशवी )

आता सुट्ट्या झाल्या थोडीशी घ्यावी म्हणे विश्रांती असेच जणू सांगते ते आपल्याला .....पण तिला सवय झालेली लहानग्यांच्या स्पर्शाची ,तिला त्यामध्ये खूप आनंद वाटायचा लहानासोबत फिरण तिला आवडायचं .शाळेला जाताना गर्दीमध्ये बस मध्ये चढताना तिला एक वेगळाच आनंद मिळायचा पण आता सुट्ट्या लागल्या दिवाळीसाठी .सगळेजण आपापल्या मामाच्या गावी निघून गेले मात्र तिला कोणी नेलेच नाही, तिला नेहमी वाटायचं आपण ही मामाच्या गावी जावं लहानग्या सोबत परत खेळावा पण .....
  तिला याचही काही दुःख होत नसाव...कारण ती खेळते विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाळेत जाताना शाळेतून घरी येताना आणि मैदानावर अशी धावाधाव सुरू असताना .तिला खूप आनंद वाटतो तर ही सर्व मुलं जेव्हा मैदानात खेळतात तेव्हा ती खिडकीतून पाहत असते त्यांच्या खेळांचे सर्व प्रकार आणि मग परत वाट बघत राहते शाळा भरण्याची त्यामुळे तिला आता करमत नसावं या मुलांशिवाय कारण तिला सवय झाली आहे या सगळ्यांच्या सोबत राहायची .....
ती वाट बघत असेल, सुट्ट्या संपण्याची परत शाळा भरण्याची का कुणास ठाऊक पण तिला सवय झाली आहे सर्व सोबत राहण्याची .तिला एकांत  नकोसा वाटतो.तिला भीती वाटते एकटे राहण्याची पण आम्ही मात्र एकटे राहणे जास्त पसंत  करतो हल्ली ,कारण आम्हाला सगळ्यांची जुळवून घेता येत नाही मात्र स्कूल बॅग आमच्या सारखे नाही तिला  सगळेच  हवे असतात , पण आम्हाला नको असतात .ती सर्वांची वाट पाहत राहते आणि आपण मात्र आपल्याच .......!

झरोका ....

सर्वांच्या वरती नजर असते त्याची , कोण येतं कोण जातं याची दखल घेतो तो नेहमी .वास्तवाचं काय ?इतिहास सुद्धा विचारा त्याला तो सांगेल सर्व जुन्या आठवणी परत परत तुम्हाला कारण त्याच्याकडे आहे नजर सर्वांवरती फिरणारी . अनेक आठवणींची सोबत आहे त्याच्या त्याला माहित आहे काय होतंय काय झालं मात्र तो अनभिज्ञ आहे पुढे काय होणार यापासून ....पण तो  नेहमी आश्चर्याने पाहतोय काही तरी होणार काहीतरी नवीन काहीतरी जूने तो  नेहमी आठवत राहतो. आनंदी क्षण असेल तरीही त्याला आनंद होतो मात्र दुःखाचे प्रसंग त्याला नकोसे वाटतात, कारण त्या दुःखामध्ये त्याला वातावरणाची खिन्नता आवडत नाही मग तो फक्त उदासपणे पाहतच राहतो .....
   त्याची नजर असते धावपळीच्या युगामध्ये कामासाठी धडपडणाऱ्या माणसा वरती लहान मुला वरती नाचणाऱ्या गाणाऱ्या लहान लहान प्राण्या वरती .त्याला कसं काय कुणास ठाऊक पण आपलं वास्तवाचं ध्यान तो  ठेवतो .त्याच्याकडे प्रत्येकाकडे बघण्याची एक नजर आहे आणि ती नजर तो तेवढ्याच प्रेमाने आणि आस्थेने  वापरतो कारण त्याला आता सवय झाली आहे प्रत्येक दृश्याला सामोरे जायचे ,त्याच्याकडे विचाराचे आदर्शांचे अनेक कंगोरे आहेत . त्याच्या या समजूतदारपणा ला खरोखरच माणुसकीचा सलाम ......!