Wednesday, November 7, 2018

नारळ

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा म्हटलं यांची उपस्थिती आलीच ....
काही का असेना कार्यक्रमाची सुरुवात ही आमच्या पासूनच शुभ कार्य हे आमच्या उपस्थितीशिवाय होणे नाही .नेहमी आम्ही अशा कार्यक्रमाचे साक्षीदारच होतो .
सण, उत्सव ,आनंदोत्सव सुरुवात या सर्वांचे आम्ही साक्षीदार ....नवे ते आमच्या शिवाय होऊ शकत नाही .
आम्हाला नेहमी माणसांच्या आनंदाचा हिस्सा होता येतं .त्यात खूप मोठे समाधान वाटतं ,जगण्याचं सार्थक झाल्यासारखे वाटतं .कारण दररोज आमचा मुक्काम कुठेतरी पोत्यात अडगळीला पडलेला त्यामुळे मग आम्ही जेव्हा माणसांमध्ये येतो कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होतो तेव्हा मनाला खूप बरं वाटतं .मग मात्र आमच्या मना मध्ये एवढा आनंद होतो की आता सर्वजण आपल्यासाठी जणू आपली वाटच पाहत बसलेले असतात ...
मग सगळ्यांकडे पाहात पाहात आयटीत प्रमुख पाहुण्यांच्य हातात जायचं आणि स्वतःला संपवायचा आणि कार्यक्रमाचा श्रीगणेशा करायचा ....
म्हणजेच स्वतःचं अस्तित्व संपवायचं आणि दुसर्‍यांना आनंद घ्यायचा म्हणजेच झाला कार्यक्रमाचा श्रीगणेशा .....
यांची ओळख कोणी ठेवताना दिसत नाही मात्र कुणाच्या हस्ते आमचे जगण्याचे सार्थक झाले हे मात्र लोक फोटो,व्हिडिओ यांच्या साह्याने आठवणी ताज्या करतात मात्र आम्हाला प्रसाद म्हणून खूप मोठा मानही मिळतो  मात्र सन्मान हा त्या ठिकाणी असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना मिळतो ....
त्यात आणखीन एक गंमत म्हणजे आम्ही जर का खराब निघालो तर आश्चर्याची एक वेगळीच गोष्ट आमच्या नजरेत भरते ती म्हणजे सर्वजण आम्हाला "नारळ पावला" असे म्हणून कुणालाही प्रसाद न मिळाल्यामुळे सर्वजणच आळंदी होतात ....हेही एक नवलच म्हणावे लागेल .
असो ,समाधान मिळते हे काही थोडके नाही त्यामुळे आपण नेहमीच सत्कार्याची सुरुवात करतो हे मनाला असणारे खूप मोठे समाधान घेऊनच आयुष्य सार्थकी लागले हा आनंद पुरून उरणारा आहे .....!

No comments:

Post a Comment