Wednesday, November 7, 2018

झरोका ....

सर्वांच्या वरती नजर असते त्याची , कोण येतं कोण जातं याची दखल घेतो तो नेहमी .वास्तवाचं काय ?इतिहास सुद्धा विचारा त्याला तो सांगेल सर्व जुन्या आठवणी परत परत तुम्हाला कारण त्याच्याकडे आहे नजर सर्वांवरती फिरणारी . अनेक आठवणींची सोबत आहे त्याच्या त्याला माहित आहे काय होतंय काय झालं मात्र तो अनभिज्ञ आहे पुढे काय होणार यापासून ....पण तो  नेहमी आश्चर्याने पाहतोय काही तरी होणार काहीतरी नवीन काहीतरी जूने तो  नेहमी आठवत राहतो. आनंदी क्षण असेल तरीही त्याला आनंद होतो मात्र दुःखाचे प्रसंग त्याला नकोसे वाटतात, कारण त्या दुःखामध्ये त्याला वातावरणाची खिन्नता आवडत नाही मग तो फक्त उदासपणे पाहतच राहतो .....
   त्याची नजर असते धावपळीच्या युगामध्ये कामासाठी धडपडणाऱ्या माणसा वरती लहान मुला वरती नाचणाऱ्या गाणाऱ्या लहान लहान प्राण्या वरती .त्याला कसं काय कुणास ठाऊक पण आपलं वास्तवाचं ध्यान तो  ठेवतो .त्याच्याकडे प्रत्येकाकडे बघण्याची एक नजर आहे आणि ती नजर तो तेवढ्याच प्रेमाने आणि आस्थेने  वापरतो कारण त्याला आता सवय झाली आहे प्रत्येक दृश्याला सामोरे जायचे ,त्याच्याकडे विचाराचे आदर्शांचे अनेक कंगोरे आहेत . त्याच्या या समजूतदारपणा ला खरोखरच माणुसकीचा सलाम ......!

No comments:

Post a Comment