Wednesday, December 5, 2018

आयुष्य

आयुष्य म्हणजे तरी नेमके काय असते ....!
चुकलेले दिवस ,गेलेल्या आठवणी ,येणारे प्रश्न ,सतावणारी जाणीव आणि असे बरेच काही .....
प्रश्न सगळ्यांनाच पडतात ,उत्तरही सगळेच शोधतात पण असे काही प्रश्न असतात की, त्यांची उत्तरं सापडतच नाहीत कितीही प्रयत्न केला तरी अगदी निरुत्तर व्हायला होतो. का कुणास ठाऊक पण मनाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही .
रस्त्यालगत उड्डाणपुलाच्या खाली एक वयोवृद्ध जोडपं दुपारच्या प्रहरी शांतपणे पोहोचलं होतं गोळाबेरीज कशाची करत होतो माहित नाही पण भावना मात्र स्वच्छ आणि सुंदर होत्या त्या टिपण्याचा मोह मला झाला आणि माझी पाऊल त्यांच्याकडे.....!
एकमेकांना या वयामध्ये ती खूप मोठा आधार देत होती गेलेल्या दिवसांची बेरीज आणि आलेल्या बाकी वरती भविष्यातला हिशोब ती मांडत होती . मला राहून राहून वाटलं नेमकं काय सांगत असतील ती एकमेकांना का  जुन्या आठवणी नवीन अनुभवासोबत मोजण्याचे काम ती करत असतील ,तेही माहीत नाही मी आपला फक्त अंदाज काढत राहिलो त्यांच्या जाणिवांचा आणि आयुष्यातल्या आलेल्या संघर्षाचा का कुणास ठाऊक पण माणूस म्हणून एक जाणीव त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली .बस !एवढेच माझ्या शब्दाचे सामर्थ्य ....!
तसेच ,त्यांच्या उणिवांना सरतेशेवटी तरी आनंदाची ,सुख-समाधानाची शिदोरी मिळो  हीच जगाच्या माऊली कडून अपेक्षा ........!

No comments:

Post a Comment